Shivaji Maharaj mentioned 'London Gazette' newspaper



The most important event in the history of Surat them with news of Britain 'London Gazette' this newsletter Category The information that was published in 1672, gave a press conference on Wednesday in history scholar Sayali palande-Datar. Maharaj said he found the English newspaper mentioned for the first time.
Original Photo of Great Shivaji Maharaj - A Indian Maratha King


History of the book in the context of research Gajanan Mehendale 'Book News' The thought being that will be mentioned palande other newspapers reported the happenings of the time-Datar plan to research on this topic today. He studied in London with the British side of the references that are available at the library's board recommended the revision history of India. London gadgets on Sunday, February 17 is printed on the first page of the Thursday, 20 February 1672 edition news Surat them. In those days there was a different kind of existence for seven-eight newspapers in London. Among them was the famous London Gazette newspaper sarakaratapher. It is not known about the news. Newspapers cognizance was taken of the most important happenings of the world. The main source of news, government documents, letters that palande-Datar said.

Surat Surat them the news that Governor alepo has written a letter to the British government. This Maharaj 'sevagee the rebel' is mentioned in the offensive. Mughal empire has lost control of many rumors in the country that we all fear, that alepo said in the letter. British before the port is a secure place for business yeethe getting possession on Mumbai, the information in this letter was to be palande-Datar said.

Then the points mentioned in this newspaper Shivaji Maharaj 'kings', 'Sir', 'Prince' and 'Raya' that was to be palande-Datar said.

War and settled by the Portuguese in Cochin Aurangzeb gadgets to charge in London, Aurangzeb and was taken note of Saturday's battle. Surat letter seems to have been made by the British or sutovaca migration. This is an important document in the history of the research will continue in palande-Datar said.

इतिहासातील महत्त्वाची घटना असणाऱ्या सूरत लुटीची बातमी ब्रिटनच्या 'लंडन गॅझेट' या वृत्तपत्रातून इ.स. १६७२ मध्ये छापून आली असल्याची माहिती इतिहासाच्या अभ्यासक सायली पाळंदे-दातार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराजांचा इंग्रजी वृत्तपत्रात प्रथमच उल्लेख सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.

इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पुस्तकातील संदर्भात 'न्यूज बुक' असा उल्लेख असल्याने त्या काळच्या इतर घडामोडींची नोंद वृत्तपत्रांतून असणार या विचाराने पाळंदे-दातार यांनी या विषयावर संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शिफारस पत्राच्या मदतीने लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध असणाऱ्या संदर्भांचा अभ्यास केला. लंडन गॅझेटच्या रविवार, १७ फेब्रुवारी ते गुरुवार २० फेब्रुवारी १६७२ च्या अंकात सूरत लुटीची बातमी पहिल्या पानावर छापली आहे. लंडनमध्ये त्याकाळी निरनिराळ्या प्रकारची सात-आठ वृत्तपत्रे अस्तित्त्वात होती. त्यापैकी लंडन गॅझेट हे वृत्तपत्र सरकारतफेर् प्रसिद्ध होत असे. यात साधारण बातम्या प्रसिद्ध होत नसत. जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींची दखल वृत्तपत्रातून घेतली जात असे. बातम्यांचे मुख्य स्त्रोत सरकारी दस्ताऐवज, पत्रे असल्याचे पाळंदे-दातार यांनी सांगितले.

सूरत लुटीची बातमी म्हणजे सूरतचे गव्हर्नर अलेपो यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र आहे. यात महाराजांचा 'sevagee the rebel' असा आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. संपूर्ण देशावर नियंत्रण असलेल्या मुघल साम्राज्याला अनेक लढायांमध्ये हरवले असून आम्हालाही याची भिती वाटते, असे अलेपो यांनी या पत्रात म्हटले आहे. ब्रिटीशांसाठी मुंबई हे ठिकाण सुरक्षित असून यावर ताबा मिळवून येेथे व्यवसायासाठी बंदर उभे करावे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली असल्याचे पाळंदे-दातार म्हणाल्या.

या वृत्तपत्राच्या नंतरच्या अंकांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख 'राजे', 'महाराज', 'प्रिन्स' आणि 'राया' असे करण्यात आले असल्याचे पाळंदे-दातार यांनी नमूद केले.

लंडन गॅझेटमध्ये औरंगजेबाने कोचीनच्या ताबा घेण्यासाठी पोर्तुगीज आणि डचांशी केलेली लढाई, औरंगजेब आणि संभाजी यांच्या युद्धाची दखल घेण्यात आली आहे. सूरतहून ब्रिटीशांनी केलेल्या स्थलांतराचे सुतोवाच या पत्रातून केले गेल्याचे दिसते. इतिहासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दस्ताऐवज असून यात पुढे संशोधन करणार असल्याचे पाळंदे-दातार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment