This event is about two years ago while working as a tour manager I am on the fort in Rajasthan the King of the church, along with the Yadav Bhatti my darshan location of Jaisalmer. This fort is the only and only yellow Mud dagadatuna sakaralela amazing. Havelya, ornamental jharoke all very cool how that Rao danaka f ....The temperature was near the summer as give some cool cool all the sweat many were in the house of 40, I made a suggestion to that do the church there was misyanca Handlebar Rajput Bhatti one went into the hotel work shops tea in a small and pretty devharyata pretty on the wall behind rajaputa of But only the top of your chest and Chhatrapati flouriest and asked them to work and know you? And Mr. Yogi, and claimed a wicket full now kept in front of the king Chhatrapati Sambhaji all books you read but how to know when his son is living in Mumbai, he said. Marathi understand him when he takes his grandson is medium comes vacations village. Bhatti's photo was on him, but I spoke to atmiyatene that they asked their name and history, but in the end said one sentence'Sivaji Maharaj, as if he was a king in Jaisalmer Jaisalmer from this pakistanaki border 100 km to 1000 km away, it is not generally, you give the maharaja Raigad respect my jacket for me that it came from my in this holy state'And that person was caught I was pretty feet of water in his eyes, but took hold.Blessed are they Shivaraya
साधारण दोन वर्षांपूर्वीची हि घटना आहे .मी राजस्थानमध्ये tour manager म्हणून काम करत असताना मी जैसलमेरच्या स्थळ दर्शनासाठी माझ्या सोबत असलेल्या मंडळीना घेऊन यादव भाटी राजाच्या किल्ल्यावर आलो . पिवळ्या मुरूम दगडातून साकारलेला हा किल्ला म्हणजे केवळ आणि केवळ अप्रतिम आहे . हवेल्या , नक्षीदार झरोके सगळे कसे एकदम मस्त .दणका च कि राव ....
उन्हाळा जवळ आला होता तापमान ४० च्या घरात होते अनेक जण घामाघूम झाले सगळ्यांना मस्त थंड काही द्यावे म्हणून मी एका छोट्या चहा टपरी काम हॉटेल मध्ये गेलो एक भाटी राजपूत पिळदार मिश्यांचा तेथे होता मंडळीना जे हवे ते घेण्याची सूचना केली आणि त्या राजपुताच्या मागे भिंतीवर चक्क देव्हार्यात चक्क केवळ आणि केवळ आपले छत्रपती विराजमान होते मग छाती फुलली आणि त्यास विचारले आपणास माहित आहे का यांचे कार्य ? त्याने श्रीमान योगी , राजा शिवछत्रपती आणि संभाजी सगळी पुस्तकेच समोर ठेवली आता तर फुल विकेट उडाली पण आपण वाचले पण समजले कसे तेव्हा तो म्हणाला त्याचा मुलगा मुंबईत राहायला आहे . त्यांचा नातू मराठी माध्यमात जातो तो जेव्हा सुट्टीत गावी येतो तेव्हा त्याच्याकडून समजावून घेतो . त्याच्याच बाजूला भाटी राजाचा पण फोटो होता मी त्यांचे नाव आणि इतिहास विचारला त्यांनी तो आत्मीयतेने सांगितला पण शेवटी एकाच वाक्य म्हणाले
'' सिवाजी महाराज जैसा अगर एक भी राजा जैसलमेर मे होता तो आज जैसलमेर से पाकिस्तानाकी सीमा १०० किमी नाही तो १००० किमी दूर रेहती , आप महाराष्ट्र से आये हे जो मेरे लिये वंदनीय हे ये मेरा प्रणाम रायगड जाके मेरे महारज को दे देना ''
आणि त्या व्यक्तीने चक्क पाय पकडले मी पकडून उचलले तर त्याच्या डोळ्यात पाणी आले होते .
धन्य ते शिवराय
No comments:
Post a Comment